दानधर्म सेवा

डॉ. गोविंद गारे शैक्षणिक व क्रीडा संकूलाच्या निर्मितीसाठी आपले योगदान द्या.आदिवासी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आपला हातभार लावा.

आदिवासी विचारमंचाच्या विविध प्रकल्पांची माहिती आणि त्यांच्या उद्दिष्टे जाणून घ्या. प्रत्येक क्षेत्र आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.

शैक्षणिक / क्रिडा संकूलाचे स्वरुप

संकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि क्रीडा संकुल निर्मिती करण्यासाठी. या क्षेत्रात स्पर्धात्मक परीक्षेची तयारी, मुलाखत मार्गदर्शन, आणि व्यायामशाळा सुविधा समाविष्ट आहे.

स्फुर्ती स्थळ

आदिवासी क्रांतीकारकांच्या बलिदानाचे स्मरण आणि प्रेरणादायी स्मारक निर्मिती. जल-जंगल-जमीन या मुलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या वीरांचे स्मारक दालन तयार करण्यासाठी.

शक्ती स्थळ

निसर्गशक्ती आणि आदिवासी कुळसायांना स्थान देणाऱ्या दालनाची निर्मिती. आदिवासी समाजातील सर्व कुळसाया, देवतांचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने स्वतंत्र दालन.

सभागृह

समाजाभिमुख निर्णय आणि सामाजिक बाबींवर चर्चेसाठी प्रशस्त सभागृह. घोंगडी बैठक, चावडी बैठक यासारख्या पारंपारिक सभांसाठी आधुनिक सुविधा.

क्रिडांगण

नेमबाजी, धावपट्टी, तरणतलाव आणि इतर खेळांसाठी आधुनिक क्रिडांगण. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी व्यायामशाळा आणि खेळाच्या सुविधा.

स्पर्धापरीक्षा केंद्र

स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आणि प्रशासकीय सेवेत पाठविण्याचे काम. मुलाखत मार्गदर्शन, गट चर्चा प्रशिक्षण आणि साप्ताहिक मार्गदर्शन कार्यक्रम.

खानावळ व वस्तीगृह सुविधा

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास, जेवण आणि सर्व आधुनिक सुविधा. मुला-मुलींसाठी वेगळ्या वस्तीगृहांची सुविधा, सुरक्षा, CCTV, इंटरनेट वाय-फाय.

आदिवासी वस्तु संग्रहालय

आदिवासी संस्कृती, वस्तू आणि पारंपारिक कलेचे संरक्षण आणि प्रदर्शन. पेहराव, शेतीची अवजारे, धान्य साठवणूक साधने, शिकारीची साधने, आभूषणे यांचे संग्रहालय.

आमचे ध्येय

"आधुनिक सुशिक्षित व अधिकारी वर्ग असलेल्या आदिवासी समाजाचे चित्र प्रत्यक्षात उतरावे!"
याच हेतूने प्रेरीत होऊन डॉ. गोविंद गारे साहेबांच्या कार्याला एक मानवंदना ठरावी म्हणून डॉ. गोविंद गारे शैक्षणिक व क्रीडा संकूलाची निर्मिती करीत आहोत.

आपली माहिती भरा आणि दान करा

खालील फॉर्म भरून आपण कोणत्याही क्षेत्रासाठी दान करू शकता. आपले योगदान आदिवासी समाजाच्या विकासासाठी वापरले जाईल.

80G कर सूट मिळविण्यासाठी पॅन क्रमांक आवश्यक

सुरक्षित पेमेंट

  • SSL एन्क्रिप्शन
  • Razorpay द्वारे सुरक्षित
  • 80G कर सूट उपलब्ध

थेट बँक ट्रान्सफर

Bank Details

मदतीसाठी संपर्क

+91 95949 18367
adivasivicharmanch@gmail.com