फोटो गॅलरी

Job Image
भारतीय संविधान सभेचे सदस्य जयपाल सिंह मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादनजन्मदिन = ३ जानेवारी १९०३मृत्यू दिन = २० मार्च १९७०जयपाल सिंग मुंडा हे भारतीय राजकारणी, लेखक आणि खेळाडू होते. भारतीय संघराज्याच्या नवीन राज्यघटनेवर चर्चा करणाऱ्या संविधान सभेचे ते सदस्य होते. ॲमस्टरडॅम येथे १९२८ च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांनी भारतीय फील्ड हॉकी संघाचे नेतृत्व केले.स्वतंत्र आदिवासी राज्य म्हणून झारखंडला मान्यता द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. पुढे ते १९४६ साली बिहारमधून संविधान सभेसाठी निवडून आले.१९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरवण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःची ओळख ‘जंगली’ म्हणून करून दिली. आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले,” आज मी त्या लाखो वीरांच्या वतीने बोलत आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले अमूल्य योगदान दिले आहे. पण आज त्यांची काही ओळख नाहीये. आपल्या देशाचे मूळनिवासी असणाऱ्या या लोकांना मागास जमाती, चोर, अपराधी, जंगली म्हणून हिणवले जाते. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की मला अभिमान आहे मी जंगली असल्याचा. देशाच्या अनेक भागात आम्हाला याच नावाने ओळखले जाते. मला फक्त हे समजत नाही की आदिवासींच्या हक्काचा प्रस्ताव मंजूर करण्यात संविधान सभेला नेमकी अडचण काय आहे? तुम्ही आदिवासींना लोकशाही मूल्य नाही शिकवू शकत. उलट तुम्हीच त्यांच्या लोकशाही परंपरा शिकून घ्यायला हव्यात. ते या पृथ्वीवरील सगळ्यात लोकशाहीने वागणारे लोक आहेत.असे सागनारे जयपाल सिंग मुंडा यांचे २० मार्च १९७० रोजी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सेरेब्रल हॅमरेजमुळे निधन झाले . ते ६७ वर्षांचे होते अशा संविधान निमिॅती साठी योगदान देणारे संविधान सभा सदस्य जयपालसिंह मुंडा यांना वि‌‌नम्र अभिवादन